STORYMIRROR

Sumit Sandeep Bari

Inspirational

3  

Sumit Sandeep Bari

Inspirational

लेखक, कवी आणि लेखणी...

लेखक, कवी आणि लेखणी...

1 min
581

लढा असो वक्तव्याचा किंवा क्रांतिकारी,

सर्वत्र लेखणी ठरली आहे सफलकारी,

गरीब असो दुबळा लेखणी सर्वांनाच तारी,

लेखणीचा आहे लेखक,कवींची दुनिया सारी. 


लेखणी असो जुनी,बेरंगी किंवा देखणी,

पण लेखक,कवींची देवता हीच लेखणी,

लिहायचे असो पत्र,हिशोब वा वाटणी,

सर्वत्र वापरली जाते ही लेखणी. 


लेखणी म्हणजे आहे एक हत्यार,

करते आपल्या विभिन्न शब्दांनी वार,

लेखक,कवींसाठी लेखणी देवता व साथीदार,

लेखणी म्हणजे लेखक,कवींचे हत्यार. 


लेखणी म्हणजे लेखक,कवींचा अभिमान,

लेखणीमुळेच होतो लेखक,कवींचा सन्मान,

लेखणी ही मोठी असो किंवा लहान,

पण लेखणीदाराचा राखला जातो मान.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational