STORYMIRROR

Sunita Ghule

Inspirational

4  

Sunita Ghule

Inspirational

लेक माझी लाडाची

लेक माझी लाडाची

1 min
1.5K

लेक माझी लाडाची


लेक माझी 

आई बाबांची लाडकी

मनीची बोलकी

वागतसे।


लेक माझी

लाडाची,हुशार,जिज्ञासू

ज्ञानाची पिपासू

राहते।


लेक माझी

साऱ्या घराचा सन्मान

कलागुणांची खाण

सर्वांगीण।


साक्षात आनंद

शब्दा शब्दातुनी माया

धडपडे दाखवाया

नेहमीच।


भावाचा आधार

राखी साऱ्यांचा मान

आईपणाचा सन्मान

करिते।


गोड बोलणे

अवखळ पाऊले ती

अंगणात किती 

राहिल।


हाताची मिठी

वाटे मज रत्नहार

लोभस फार

गोजिरवाणी।


लेकीचे गुण

वर्णाया शब्द कमी

कर्तृत्वाची हमी

देतसे।


लेकीची काळजी

मन चिंता करी

आईची परी

समजावते।


धरूनिया हात

बने माझी आई

नाजूकशी जाई

डोलते।


नक्षत्राचे देणे

मज हे लाभले

भाग्याने दिधले

देवाजीने।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational