लांबचा प्रवास
लांबचा प्रवास
ओढ होती वेगळी वाट धरण्याची
पण चारचौघींच्याच प्रश्नातच अडकलेली
पाश तोडू पटकन म्हटले तरी तोडता कुठे येतात?
प्रश्न प्रश्नच समोर उभे ठाकतात!
न तोडता ते पाश हळुहळू पाऊल पुढे टाकले
एक पाय घरांत घट्ट रोवला
डगमगला विचार तरी घरची नाळ तोडली नाही!
पंख पसरवण्यासाठी शिक्षणाची कास धरली
बळ पंखातले वाढत गेले
आपण शिकलेले इतरांना शिकवले
मिळाले मान सन्मान ह्या प्रवासात
आले निमंत्रणे दूरदेशीचेही
मग घडत गेले लांब प्रवास वारंवार!
