लाज
लाज
बालपण लाजत गेलं
तरूणपण लाजत आलं
कधी उगीचच लाजायचं
लाजत लाजत आतली कडी लावायची
कपडे काढायचे
पुन्हा घालायचे
पोट वाढवायचे
बाळांत व्हायचे
सगळं सगळं लाजत करायचे
उष्ट्या ताटात जेवायचे
शिव्या खायच्या
मार खात खात
तरूणपण नासवात नासवत
म्हातारं व्हायचं
दुखण सहन करायचं
आणि ....
एक दिवस लाजत लाजत मरूनही जायचं
