STORYMIRROR

Manisha B

Inspirational Others

3  

Manisha B

Inspirational Others

लाडकी लेक

लाडकी लेक

1 min
187

जिच्या पोटी लेक जन्म घेते

ती माय धन्य या जगती

उदरात नऊ महिन्याची परीक्षा

पास होऊनी येते बाहेर पणती


गोड तिच्या हास्यात रमती सगळे

छोटी छोटी पाऊले मोठी होई जेव्हा 

माहेर सोडून सासरी जाते लेक लाडाची

जीव आईचा केविलवाणा होतो तेव्हा


आई लेकीच नात अतूट बंधन

आईच्या मिठीत सांत्वन लेकीच असत 

हट्ट लेकीचे पुरवण्या आई बाबा सदैव तत्पर 

ओझं लेकीच आई बाबा कधीच नसत 


जबाबदाऱ्या लेकीला दोन्ही घरच्या

सासर आणि माहेर नात्याची असते वीण

प्रकाश देते दोन घरी लेक लाडाची

आई बाबाच्या चरणाशी होते लीन 


आई बाबासाठी लहान परी असते 

हृदयात जपती फुलापरी

जोवरी श्वास हा श्वासात असतो 

तोवरी आईबाबांचा जीव लेकीवरी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational