STORYMIRROR

Manisha B

Fantasy Inspirational Others

3  

Manisha B

Fantasy Inspirational Others

देव

देव

1 min
196

मी तुझ्यात गुंतले देवा

सेवा तुझी करण्यात दिस गेला

मना वाटे प्रसन्न पाहुनी तुला

वेड्याचा वेष तुजसाठी धारण केला


स्नान तुला घालिते आवडीने

फुले तुला वाहून मन प्रसन्न होई 

प्रेमाने गोड घास तुला भरविते

तुझे दर्शन घेण्याची असते मला घाई


तूच देतो जगण्याची नवी उमेद

हाती तुझ्या असते सर्वकाही

सुख दुःख सावल्याचा खेळ

तुझ्याविना झाडाचे पान हालत नाही


 आशीर्वाद असू दे सदैव डोईवरी

हात जोडीते तूजला दिन राती

आचरण प्रेमळ सदैव ठेव अंतरी

ज्ञानाच्या उजळू दे प्रकाशमय वाती



Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy