STORYMIRROR

Manisha B

Fantasy Inspirational

3  

Manisha B

Fantasy Inspirational

स्त्री वेदना अंतरीची

स्त्री वेदना अंतरीची

1 min
16

स्त्री वेदना अंतरीची 

लपवून अश्रू डोळा

आनंद सर्वां देऊनी 

मायेचा लाविते लळा 


आशेची झालर लेते 

अस्तित्व जपूनी उरी

दुःख भोगीते समयी

दोन्ही घरी लक्ष्मी खरी


अन्नपूर्णा अन्न करी

घराचा सांभाळ करी

भाव तिला ना या जगी

घाव पडती जिव्हारी


आयुष्य लढा भक्कम 

भोग रोज ती भोगते

तळमळ ह्रदयाची 

संसार विश्व जोपते


 जीवन अर्पिते सदा 

करिते सर्वांची सेवा

विचार सर्वांचा आधी

 सुखी सर्वां ठेवा देवा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy