भारत माता कि जय
भारत माता कि जय
प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व मोठे
अभिमान आम्ही ह्रदयी जपतो
संकटाना सामोरे जातो हिंमत ठेऊनी
भारत माता कि जय मुखी वदतो
शूरवीर होऊन गेले या धरतीवरती
अन्यायाला वाचा फोडूणी लढले
अजर अमर होऊनी देतो मानववंदना
देशासाठी बलिदान दिले कधी ना नडले
26 जानेवारी 1950रोजी राज्यघटना स्थापिली
तिरंगा झेंडा फडके उंच उंच दिमाखात
वंन्दे मातरम, जन गण मन गुणगुणती जल्लोषात
प्रजासत्ताक दिन साजरा होतो आनंदात
सीमेवरती सैन्य आपुले लढती शौर्याने
गणराज्य दिवसा शोभा येते जिकडे -तिकडे
21 तोफांची होते सलामी जय हिंद जय भारत
गर्जना करुनी आम्ही गिरवितो माणुसकीचे धडे
