सावित्रीबाई फुले
सावित्रीबाई फुले
अन्याय सहन केला
महिलांना साक्षरतेचा धडा दिला
निंदा करती लोक तरीही निश्चय पक्का केला
आज तुझ्यामुळेच हा दिवस आम्हा लाभला.. 1
शेण चिखल घेऊनी अंगावरी
एकच तिची वीरकल साडी
झुंज देऊनी जिंकला गड
लगबगीने चाले पायाची गाडी.. 2
स्वप्नांना केले जागे
आज सारे विश्व् तिच्या मागे
स्मरावे तिला पदोपदी
महिला साक्षरतेचे विणले धागे.. 3
सावित्रीबाईंच्या लेकी आम्ही
शिक्षण देऊन केले मोठे
ज्ञान देऊनी उजेड केला
नाव तुझे घेता अभिमान वाटे.. 4
युगेयुगे सावित्रीबाई फुले
अशीच राहो तुझी ख्याती
उपमा देण्या शब्द अपुरे
साक्षर सगळे उजळल्या वाती.. 5