अबोल प्रेम
अबोल प्रेम
जेव्हा जेव्हा तू दूर जातोस
वेड्या मना परतण्याची आस तू लावतोस
तू माझ्या मनाला भावतोस भावतोस
असा कसा जीव तू माझ्यावर लावतोस
नजरेला नजर जेव्हा मिळते
ह्रदयाची कळी खुदकन खुलते
स्वप्नाची चादर नव्याने झुलते
तुझ्या नादात मी सारेच भुलते
प्रेमाची अक्षरे ओठांवर येतात
होकारांची फुले मनी झुलतात
प्रश्न अनेक मनी उठतात
तुझ्या बोलण्याची वाट पहातात
वेडी वेडी झाले मी तुझ्यापायी
तुझ्याशिवाय मला काही सुचत नाही
तू मला आणि मी तुला बोलत नाही
ह्रदयाची दरवाजे काही केल्या खोलत नाही
