दरवळ
दरवळ
1 min
227
गंध हा फुलांचा जातो बहरून
दरवळतो हा हळूच जीवनी
नाते मज गूंफायला खुणावतो
मोहून टाके हा पानोपानी ll1ll
वाटे मज सुगंध व्हावे
तुजसवे आनंदाने बागडावे
विसरून दुःख सारे अंतरीचे
आनंदाचे मनी गीत गुणगुणावे ||2||
निसर्ग पाहुनी नयनी भावना दाटल्या
धुक्यासवे मना स्पर्शुन गेल्या
कळीचे होऊनी फुले उमलली
झालर हि अत्तरी मना सुखावल्या ||3||
