STORYMIRROR

Manisha B

Classics Inspirational Others

3  

Manisha B

Classics Inspirational Others

आनंदी दिवाळी

आनंदी दिवाळी

1 min
166

दिवाळी सण मोठा 

आनंदाला उधाण 

 रेखाटलेली 

  रांगोळी 

बहू छान 

 फराळाचा केला साठा.. 


दिव्य रोषणाई पणतीची 

आकाशकंदील सुंदर 

नक्षीदार 

कलाकुसर 

उजळी दिशा 

पणती शोभे मातीची..


अभ्यंगस्नानाला दिवाळीचे महत्त्व 

लक्ष्मी पूजनाचा 

थाट 

फुलांचे 

सजले तोरण 

आले घरा पावित्रत्व.. 


यजमाना ओवाळी पाडवा 

आरतीचे ताट 

मांडीयला 

पाट

क्षण सौख्याचे 

संसारी असावा गोडवा 


बहिण भावाची गुंफण 

सुरेख नात्याची 

भाऊबीज 

उत्साहाला 

येतो बहर 

एकरूप होते बंधन.. 


शुभेच्छा वर्षाव सर्वांचा 

पडतो कानी 

फराळाची 

तयारी 

घराला घरपण 

आशीर्वाद मिळतो थोरांचा... 



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics