STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others

3  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others

कविता

कविता

1 min
212

कविता काळजाला स्पर्श करणारी 

शब्दांतून वेदनांना वाचा फोडणारी 

डोळ्यांतून खरे भावस्पर्श मांडणारी

दुःखितांचे दु:ख व्यक्त करणारी 


कविता विद्रोहाचे प्रतिनिधित्व करणारी 

अज्ञानाला ज्ञान देऊन सतर्क राहणारी 

जगाला अंधश्रद्धेतून बाहेर काढणारी 

कविता जगाला शांतीचा संदेश देणारी 


कविता विश्वबंधुता जगाला सांगणारी 

संतांचे विचार कायम जीवंत ठेवणारी 

माणुसकीचा धडा सतत शिकविणारी 

 न्याय,समता,एकताचे शिक्षण देणारी 


कविता संस्कृती,संस्कार शिकविणारी 

आदर्श मूल्ये कायम जपणारी 

शोषितांचे प्रतिनिधित्व करणारी 

शेतकरी, मजूर, कामगारांची व्यथा मांडणारी 


कविता साहित्यिकांची प्रेरणा ठरणारी 

शब्दांतून अन्यायावर वार करणारी 

जगणार्याला कष्टाची हिम्मत देणारी 

सत्यासाठी कायम लढा उभारणारी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational