कविता
कविता
कविता कशी करावी ?
साधी करावी,
सोपी करावी
दुसऱ्यांना समजेल अन
उमजेल अशी करावी
कविता कोठे करावी?
घरात करावी,
बाहेर करावी
ज्याठिकाणी सुचत असेल
त्याठिकाणी लगेच करावी
कविता कोणावर करावी?
आई वर करावी,
बायको वर करावी
जीवापाड प्रेम करणाऱ्या
जुन्या प्रेयसीवर करावी
कविता का करावी
मन समाधानासाठी करावी
कुणाचे तरी दुःख दूर
सारण्यासाठी करावी
