STORYMIRROR

Nasa Yeotikar

Others

2  

Nasa Yeotikar

Others

पाऊस-पाणी

पाऊस-पाणी

1 min
2.2K


पावसाळा सुरु झाला तरी

अजून पाऊस पडत नाही

शेतात पेरले बियाणे म्हणून

रातभर झोप लागत नाही

 

पीक लहान असताना त्याची

घ्यावी लागते काळजी खुप

औषध-पाणी वेळेवर मिळाले

तेंव्हाच तर दिसेल सुंदर रूप

 

एकदा झाले मोठे पीक

की काळजी ना तमा

थोडी जरी केली देखभाल

काही तरी होईल जमा

 

वेळेवर मिळाले खत पाणी

तर शेतातील पीके बहरतील

हिरवे हिरवे रान पाहुनी मग

शेतकऱ्यांची ही मने डुलतील

 

त्यासाठी गरज आहे शेताला

वेळेवर पाऊस-पाण्याची

पीके वाचतील आणि मिळेल

तेंव्हाच शेतकऱ्यांच्या जीवाची हमी


Rate this content
Log in