आरक्षण
आरक्षण
देऊन आम्हाला आरक्षण
समृद्ध केले आमचे जीवन
गावाबाहेरची होती वस्ती
लोकं होती दुःखी कष्टी
त्यांना नव्हते कोणाचे रक्षण
देऊन आम्हाला आरक्षण
समृद्ध केले आमचे जीवन
आमच्या स्पर्शाचा विटाळ
जिवंतपणी किती तो झळ
माणुसकीचे नव्हते लक्षण
देऊन आम्हाला आरक्षण
समृद्ध केले आमचे जीवन
उद्धार करण्या या कुळाचा
जन्म झाला भीमरायाचा
इतिहासात नोंदला तो क्षण
देऊन आम्हाला आरक्षण
समृद्ध केले आमचे जीवन
त्यांनी केला खूप अभ्यास
समाजसेवेचा धरुनी ध्यास
त्यांनी केले वंचितांचे रक्षण
देऊन आम्हाला आरक्षण
समृद्ध केले आमचे जीवन
लोक कल्याणासाठी केला कायदा
मागासवर्गीयाना मिळाला फायदा
सर्वांची आत्मा आहे संविधान
देऊन आम्हाला आरक्षण
समृद्ध केले आमचे जीवन
