#mother
#mother
1 min
14.3K
आईची माया ही
जगाहून निराळी
आई विना जीवन असे
आयुष्याची पोकळी
समंजस असो वा
असेल ती अडाणी
जीवनाचे सार सांगुनी
करी बाळाला शहाणी
जिजाऊच्या प्रेमाने
राजे शिवाजी घडले
मावळ्याच्या मदतीने
मराठी राज्य निर्मिले
आई असेल कशीही
कुमाता न भवति
लेकरांना सांभाळूनी
करी देशाची प्रगती
आईविना आयुष्याची
पाटी असेल कोरी
जसे तिन्ही जगाचा स्वामी
आई विना भिकारी
