जुगार
जुगार
1 min
13.8K
जुगार खुप वाइट असतो
ज्यात माणूस होतो बाद
शेतकरी ही खेळतो जुगार
अन होतो दरवर्षी बरबाद
त्याचे संपूर्ण जीवन असते
पावसाच्या पाण्यावर अवलंबून
शेती भाती आणि इतर अनेक
काम करतो त्याच्यावर विसंबून
हवामानाचा अंदाज घेऊन तो
शेतात महागडी बियाणे पेरतो
घोर लावून त्याच्या काळजाला
ऐनवेळेला पाऊस दडून बसतो
चांगला पाऊस पडून कधी
पिकले काही चार दाणे
बाजारात त्याला किंमत नाही
हवे तेवढे मिळत नाही नाणे
आसमानी-सुलतानी अश्या
धर्मसंकटात तो दरवर्षी फसतो
लॉटरी लागेल कधीतरी म्हणून
सर्वात मोठा तो जुगार खेळतो
