पाऊस
पाऊस
1 min
634
कुणी सांगेल का ?
पाऊस गेला कुठे ?
कुणी बोलेल का ?
पाऊस दडला कुठे ?
दरवर्षी हेच
येरे माझ्या मागल्या
का नाही पाऊस
कारणे नाही कळाल्या
झाडेही लावली
झाडे जगविली सुध्दा
पाण्यासाठी आम्ही
भंडारा केलो सुध्दा
देवाला पाण्याने
अभिषेक करविले
धोंड धोंड पाणी
मुलांनी गाणे गाईले
पाऊस रुसला
हे उशीरा कळले
रुसलेल्या मना
रुजविता न आले
पावसाळा असा
संपून गेला अखेर
शेतातील पिके
करपली जागेवर
