STORYMIRROR

Sandhya (Bhoir)Shinde

Inspirational Others

3  

Sandhya (Bhoir)Shinde

Inspirational Others

कविता माझी सांगते

कविता माझी सांगते

1 min
231

रूक्ष या जीवनी माझ्या

शुष्कताच खोल रुजते

माणूसपण जाते हरवून

निराशाच मनी सजते


कुठून अचानक येते

या जीवनी ही कविता

वळण देऊन अनोखे

प्रवाहित झाली सरिता


क्षणार्धात ती बदलते

दयनीय जीवनाची दशा

सुसह्य करून जगण्याला

देते नवस्वप्नांना दिशा


कलंडलेल्या जीवनास

एकाएक मार्ग दावते

अखंड लिहीत जा

कविता माझी सांगते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational