कवीचे मागणे..!
कवीचे मागणे..!
छोटे छोटे शब्द मला
सहज सुचत जावेत
भावनांना त्यांनी
कवेत लीलया घ्यावेत
मला काय वाटते
त्यांनी आपोआप जाणावे
गीत अंतरातील
त्यांनी सहज गुणगुणावे
शब्दातीत हितगुज
सहज ते घडावे
काव्य मंदिरात सदा
पाऊल माझे पडावे
पावला गणिक
ठसा वेगळाच उमटावा
वेगळाच प्रवास
कवितेचा माझ्या घडावा....!!
