कवी…...!
कवी…...!
कवी लोकांनी मला हैराण केले
सारे शब्द चोरून निघून गेले
अक्षरांची जुळवा जुळव करून
पुन्हा मला शब्द शोधावे लागले
शब्द साले वैरी झाले
आत कोठेतरी लपून बसले
लेखणीचे जणू पूर्व जन्मीचे
ते जणू वैरीच निघाले
आज अचानक कुलूप तुटले
तसे कैद खान्यातून मुक्त झाले
एक एक करून मग
सारेच बाहेर पडू लागले
आता माझीच मोठी पंचायत झाली
मला त्यांची ओळखच नाही लागली
म्हणून आज त्यांना बाहेरच बसवले
आणि अंतरात मी दोनच शब्द कैद केले
त्या दोन शब्दांची ओळख मज लागली
त्यांनी माझी ओळख जगतास झाली
कसेतरी त्या दोन शब्दास बेडी घातली
तेव्हा कोठे मनाची पाटी 'कवी' शब्दाने नटली....!!!
