Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Abasaheb Mhaske

Abstract

1  

Abasaheb Mhaske

Abstract

कवी मी ...

कवी मी ...

1 min
522


कवी मी , कवी मी 

भावनांमधून हावी मी 

लेखणीतून जग दावी 

अंधकारास संपवणार मी 


कवी मी , कवी मी

सप्तसुरांची जणू बासुरी   

दुःख , वेदनांची भट्टी कधी 

तर कधी अश्वस्थेचे माहेर घर 


कवी मी , कवी मी

असुरी शक्तीस धाक मी  

दीन दलितांची हाक मी

बदनाम प्रेमी हकनाक मी  


कवी मी , कवी मी

आमंत्रित मी त्सुनामी 

सागर धीरगंभीर , भरती - ओहोटी 

कधी मिलनोत्सुक सरितेची आसं मी  


कवी मी , कवी मी

नाहक बदनाम छवी मी 

प्रणय पंढरीचा वारकरी मी 

त्र्यंबक नावाचा बालकवी 


कवी मी , कवी मी

लिहतो मी , लिहणारंच मी

नाही वांधा , कुणी नींदा , 

कुणी वंदा मी तर खुदाचा बंदा


कवी मी , कवी मी

वेदनेचा गाव मी 

भावनांचा ठाव मी 

क्रांतीचा उठाव मी 


कवी मी , कवी मी

संत , सुधारक मी देशभक्त 

अन्याय होता सळसळते माझे रक्त 

क्रांतिसूर्य होऊनि आग ओकतो बनुनी लेखणी  


 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract