STORYMIRROR

Sarika Jinturkar

Drama Others

3  

Sarika Jinturkar

Drama Others

कुटुंब रंगले घरात...

कुटुंब रंगले घरात...

1 min
285

 लाॅकडाऊन मुळेच आलाय घराला घरपण,

 बाह्यपरिस्थिती पाहून,  

कुटुंबातील सगळेच आता म्हणू लागले सगळ्यांना 

 तुमच्या सगळ्यांसाठी कायपण...


 जुन्या आठवणीतले, क्षण जगत आहे आता प्रत्येक जण, 

 देश कार्य करणाऱ्यांसाठी सगळ्यांचे झुरत आहे कुठेतरी मन...

 तुरुंगवास वाटत असला तरी मन उल्हासित करणारा वाटतो आहे आता प्रत्येक क्षण, कारण  

कुटुंबासोबत मनसोक्त हसत ,खेळत,पत्ते ,कॅरम बॅटमिंटन

इत्यादींचा डाव रचत, मनमोही, मनभावन सुंदर जगत आहे सगळे जीवन....


 पहाटेच्या भजन पूजनात मन रमत आहे,

देवाचे अधिक नामस्मरण केल्यामुळे सकाळ अमर होत आहे,

मधुर गाणी शास्त्र, स्वाध्याय दिवसभरासाठी ऊर्जा देऊन जात आहे,

 व्हाट्सअप आणि फेसबुक सर्वत्र असून ,झाडाची फुले अंगणात डोलत आहेत... 

 कुटुंबासोबत अविस्मरणीय क्षण प्रत्येक जण घरातच अनुभवत आहे..

 हॉटेलची भेळ, पाणीपुरी, कचोरी, रगडापुरी त्या आठवणीचे अनेक सुखद क्षण आजही दाटत असले उरी..

 तरी आम्ही 'सारे खवय्ये' म्हणून रोज नविन पदार्थाची रेलचेल सुरू आहे घरोघरी...

 आता सारेजण झाले आहेत आपल्या कुटुंबांमध्ये मग्न,  

वाढला आहे एकमेकांशी संवाद आणि एकमेकांचं बोलणं.. 

 कुटुंबासोबत घालून वेळ जपूया आठवणी, ठेवून या साठवणी..  

सौंदर्यपूर्ण आयुष्याचे हेच तर खरे उत्तर..  


कुटुंब रंगलयं घरात, आनंद आणि उत्साहात.... 

 

आता सगळे छान असले तरी सगळे गेले कंटाळून , परमेश्वरा लवकर संपो हे लाॅकडाऊन... 

 हे लाॅकडाउन.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama