कटकट
कटकट
सर्वंच पतींना पत्नीची कटकट,
नको-नको सी वाटते.
पण प्रेमा करणा-या पत्नीला,
ती हवी- हवी वाटते.
सर्व मना सारखे असतांना,
ती कटकट सारखी कां करते ?.
याचा खुलास कौनचीच पत्नि,
कधीच पतिला करत नसते.
कटकटीच्या अस्त्राने पतीचा,
मर्दपणा ती मोजत असते.
पतीच्या प्रतिसादांचे मूल्यांकन,
सारखे ती असे करत असते.
म्हणुन जसे –जसे लग्नाचे,
सारखे वर्ष वाढत असते.
तस –तसा तिचा कटकटीचा,
व्याप व अवधी वाढत जाते.
कटकट ही तीची आपली,
तुमच्यासाठी लिटमस टेस्ट असते.
पतीची मर्दांगीनीची पी. एच सारखी,
अशाने ती नेहमीच मोजत असते.
तीच्या पतीची पी. एच,
नेहमीच स्थिर असावी,
म्हणुन ती कटकटिची झड,
सारखी पतीला लावत असावी.
हेच प्रेम करणा-या पत्निचे,
गुपित पतीने समजुन घ्यावे.
अधुन-मधुन सांडासारखी पतीने,
पत्नीला हुलकावनी देत राहावे.
अशाने तिला मधे-मधे तुमच्यातील,
हारवलेल्या नवरेपणाची जाण होते.
अजुन नवरा बैल झाला नाही,
याची तिला शत-प्रतिशत खात्री होते.
तुम्ही एक्दाचे बैल झाले की मग,
पत्नीचा आत्मविश्वास डगमगावते.
पतीची पी.एच स्थिर करण्यासाठी,
मग कटकटीचा डोस ती वाढवते.
कटकटिच्या गुंताडा अभियातुन,
आपन तिला कशे बाहेर काढावे.
त्या साठी मुंगेरिलालचे स्वप्न तिला,
कधी-कधी अधून-मधून दाखवावे.
कटकटीने पतीला लुप्त पावलेल्या,
जुन्या प्रेमाचे आठवण पतीला होते,
जुन्या रेशीम गाठींनी पतीची,
पी. एच पत्नी यथावत करते.
