कष्टाविना फळ नाही
कष्टाविना फळ नाही
जीवनात महत्वाचे
असतात प्रयत्न,
अनेक अडथळे ओलांडुनी
मिळते सुखाचे रत्न
ध्येय गाठायचे असल्यास
स्वतःच शोधाव्यात वाटा,
मगच यशाच्या किनाऱ्यावर
येऊन भेटतील आनंदलाटा
सहज येथे असे काहीच नाही
संकटांचा खडतर हा प्रवास,
आरामदायी जगणं म्हणजे
सोसावा लागतो फक्त त्रास
जिद्द आणि चिकाटी हे याचे
मानावेत नेहमीच अग्रक्रम,
सोनेरी क्षण दाखवणारा
मोलाचा मंत्र म्हणजे, श्रम
ही शर्यत पार केल्यावर
उमगेल खरा आयुष्याचा अर्थ,
मेहनतीचे तुमच्या चीज होईल
जाणार नाही हा यज्ञ, व्यर्थ
खूण सार्थकाची वाटावी
आपल्या हाता-पायांचा मळ,
गड्या, हाच जगण्याचा सार
कष्टाविना नाही फळ
