कष्ट
कष्ट
नसेल काही जवळ जरी, विकली नाही लाचारी.
लागेल तेवढ कमावतोय, कधी केली नाही उधारी.
हात पाय हलवतोय, म्हणून कष्टाची खातोय.
नाहीतर उपकाराच्या नावाखाली, कोणीपण भीक वाढतोय.
पण ते मंजूर नव्हते, प्रश्न होता अस्तित्वाचा.
आयुष्यात खरा आनन्द तेव्हाच, जेव्हा घामाला वास येतो कष्टाचा.
