कष्ट आणि त्याग
कष्ट आणि त्याग
आयुष्य खरच आहे चमत्कारी
थोडं पेरून उगवत इथं भारी
थोडे कष्ट आणि त्यागाची शिदोरी
देते यश बनून थोडे शिरजोरी
त्यागाची परीक्षा आहे रोज दिनवारी
त्यागाशिवाय पर्याय बेकार सारी
स्वतःचे बनून स्वतः सल्लागारी
यशस्वी आपण करून कष्टाची तयारी
कष्ट आहे मूर्तिमंत त्यात त्याग आहे भारी
यशासाठी बनतात दोघेही कलाकारी
त्यागशिवाय यश म्हणजे सगळं चिरकूटधारी
थोडे त्यागातून बनतो आपण खरे दरबारीं
व्यसन इर्षा लोभ माया आहे खरे भूभूत्कारी
आयुष्य जात याचा अनुभव घेऊन सारी
त्यागाशिवाय पर्याय नाही बना आता गिरीधारी
दिशा दया आयुष्याला बनून स्वतः अनुस्वारी
त्यागाची व्याख्या खरंतर कष्टाची कर्जदारी
दोघेही आहे आयुष्याचे खरे जीवनधारी
यांच्याशिवाय यश खरं बनत टोकदारी
त्याच्यामुळे आयुष्याची आहे दिशा चमत्कारी.
