STORYMIRROR

Pratibha Bilgi

Inspirational

3  

Pratibha Bilgi

Inspirational

क्षणिक सुख

क्षणिक सुख

1 min
270

निसर्गाच्या सान्निध्यात मन आपोआप रमते

कुठल्याच अनावश्यक गोष्टींना प्राधान्य तेथे नसते

प्रत्येक जीव - जंतूंचे वेगळेच महत्व येथे असते

कोणत्याच चढाओढीची अपेक्षा अंतरंगी न बाळगते


जग आहे प्रत्येकाचे मी तर हे समजते

आहे जगण्याचा समान हक्क असंच गृहीत धरते

परंतु स्पर्धा जेव्हा होते सुरू विसरुनी सर्व जाते

स्वर्गासम असलेली धरा जणू यमनगरीत बदलते


अहंकार , मी पणा सारख्या गोष्टींचे महत्व किंचित वाढते

या मागे प्रेम , दया , आपुलकीचे तत्व फिके पडते

भावनांना नाही काहीच मोल कालांतराने कळते

माणुसकीची नाजूक कळी उमलण्या अगोदरच कोमेजते


विसरावे सगळ्यांनी राग , द्वेष अन् असूया मनापासूनी वाटते

जपा एकतेचा मंत्र , करा सर्वांवर प्रेम सल्ला हाच देते

सार्थक होवो क्षण अन् क्षण प्रयत्न सतत करते

क्षणिक सुख हे मानव जीवन अंततः मातीत जाऊन मिळते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational