क्षणात येते कुठून उदासी ?
क्षणात येते कुठून उदासी ?
क्षणात येते कुठून उदासी ?
विरक्ती येते होतो मी विजनवासी
भांबावल मन सैरभैर होतं.जातं
क्षणभर वाटून जाते का जगावे ? कोणासाठी ?
कधी आपण भावनाविवश होऊन
मनातला पाऊस डोळ्यात दाटतो ...
कितीही विसरायचा प्रयत्न केला तरी
नकोस सारं आठवत जात...
तेव्हाच अचानक येते आनंदाची झुळूक
अन बदलून जातं सारंच भावविश्व्
आनंदानं मग नाचवसं वाटतं बिनधास्त
स्वछंद होऊनि जगावंसं वाटतं पाखरासारखं ...
तुझ्या मर्जीशिवाय काडीही हालत नाही
तू तर आसमंतातही मावत नाहीस ...
तू तुझ्या मर्जीचा मालक गड्या
तुझ्या इशाऱ्यावर सारे जग डोलते
सारं काही आठवून मन चाळवते
तीच जखम पुन्हा नव्याने भळभळते
धन्य तू मना रे ! तुझेच हे खेळ सारे ..
तूच नाचतोस फुलवून पिसारे ..
सांग मना ! तू असा कसा रे ? तू ध्येयवेडा
कधी होतोस भोळासांब तर कधी ठार वेडा
काहीही झालं तरी तो तुझाच गाडा हाकतोस
तूच आमच्यावर अधिराज्य गाजवतोस
सांग मना ! तुझ्यात नि तिच्यात फरक काय ?
दोघेही आपल्याच मर्जीचे मालक म्हणूंन की काय
तीही वागते तिच्याच मर्जीने अन तू हि तसाच
जगूही देत नाही अन मरूही देत नाहीस ...
