STORYMIRROR

Sonali Butley-bansal

Inspirational

4  

Sonali Butley-bansal

Inspirational

क्षण

क्षण

1 min
624

घटिका पळे शब्द झाले आता कालबाह्य...


तास, मिनीटे, सेकंद यांचेच आता वर्चस्व


 हे तर रुटीन कामाचे सोबती ...


हे साचत साचत जातात

आणि काळ या संकल्पनेत उतरत जातात...


भूत वर्तमान व भविष्य हे त्या त्या काळाचे दर्शक...


खरं तर वास्तवाला नसतो भूतकाळ

अन् भविष्याचे कोंदण

असतात फक्त वर्तमानाने भारलेले क्षण ....


कधी हवे हवे से वाटणारे

कधी नकोसे वाटणारे

तर कधी हवे नकोच्या संघर्षात झुलणारे....


हवे हवे से वाटणारे नकळत निसटून जातात

नको असणारे ताकदीबाहेरदेखील झेलावेच लागतात ...


हवे नकोच्या हिंदोळ्यात असे विखुरलेले क्षण भूतकाळात साठत जातात भूतकाळ कधी वर्तमानात जगतात येतो का?...

वर्तमाना शिवाय कधी भविष्य आकारास येतो काय?

म्हणून हातात घट्ट पकडून ठेवायचे असतात आहे ते क्षण. ..

आहे ते क्षण. ..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational