क्षण आनंदी
क्षण आनंदी
क्षण स्वर्गीय सुखाचा
बाळ कवटाळण्याचा
रोमरोमी हर्ष उर्मी
आनंदाश्रू दाटण्याचा
क्षण विजेतेपदाचा
हर्षोन्मादे नाचण्याचा
सरावाचे हो सार्थक
मोद दाटे विजयाचा
प्रीत बोले नयनांशी
मुग्ध भाषा नयनांची
शब्दावीण सांगतसे
गोड गुपिते मनीची
मुग्ध प्रीती नवोढेची
शब्द ओठी अडतसे
क्षण येता मीलनाचा
समर्पण भावतसे
थाप खास सखयाची
पडे अनेक वर्षांनी
दाटे हर्ष भेटीमधे
स्थलकाल विसरुनी
क्षण आनंदाचे हाती
मोती जणू सौख्यभरे
घडी सौख्याची जीवनी
राहू दे प्रभूराया रे
