STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Inspirational

3  

Abasaheb Mhaske

Inspirational

करुया स्वागत नवं वर्षाचे

करुया स्वागत नवं वर्षाचे

1 min
14.2K


ज्ञानरुपी उजळुनी ज्योती

मांगल्याची ओवाळूू आरती.

नांदेल इथेही सुख शांती

समॄध्द बनवुया सबंध धरती

करुया स्वागत नवं वर्षाचे 

जाती पातीच्या तोडूनी भिंती

अहंकारास देउनी मूठमाती

विसरूनी सारी व्यर्थ भ्रमंती

माणुसकीची जोडूया नाती

करुया स्वागत नवं वर्षाचे 

हेवे - दावे विसरूनी सारे

जगणे सुकर करू चला रे

मुर्दाबादचे नकोच नारे

अखंड भारत बनवू चला रे

करुया स्वागत नवं वर्षाचे

आशेच्या या क्षितीजावरती

आकांक्षारुपी तारे विसावती 

जिव्हाळ्याची जोडूनी नाती

झेप घेवूया गगनावरती 

करुया स्वागत नवं वर्षाचे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational