करु कोरोना हद्दपार
करु कोरोना हद्दपार
सुयश चिंतून मनी खास
निघा कोरोनाला हरवण्यास
करू नेस्तनाबूत त्यास जी जी।।
म्हणा कोरोनाला भिणार नाही
राहू लढण्यास सदा तत्पर बाई
मागे मुळीच हटणार नाही जी जी।।
कोरोना असे जरी भयंकर
ठेऊन सुरक्षित जरा अंतर
करू त्यालाच छुमंतर जी जी।।
