कर्तृत्ववान अहिल्याबाई
कर्तृत्ववान अहिल्याबाई
कित्येक स्त्रियांनी पूर्वीच्या काळी
असामान्य कर्तृत्व दाखवले
त्यांच्या प्रयत्नांमुळेच
आज स्त्रीचे जगणे सुखकर झाले
अश्याच एक होत्या
अहिल्याबाई होळकर
दानशूर, कर्तृत्ववान राज्यकर्ती
नाव झाले अजरामर
अहिल्याबाईंनी आपल्या सासऱ्यांचा
विश्वास सार्थ केला
सती न जाता प्रजेसाठी
राज्य कारभार हाती घेतला
नर्मदेच्या तीरी, महेश्र्वरला
राजधानी वसवली
तिथल्या वस्त्रोद्योगास
नवी दिशा मिळाली
साहसी वृत्ती बरोबरच
परोपकराचे भान होते
गोरगरिबांना अन्नदान
सढळहस्ते केले होते
नदी घाट बांधले
मंदिरांचा जीर्णोद्धार केला
वाटसरुंसाठी पाणपोई
धर्मशाळा बांधल्या
त्यांच्या राज्यात
न्यायव्यवस्था चोख होती
विधवा स्त्रीला मूल दत्तक
घेण्याची मुभा होती
शिवभक्त अहिल्याबाईंचे
कर्तृत्व मोठे होते
म्हणूनच आजही त्यांचे नाव
आदराने घेतले जाते
