STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

1.0  

Prashant Shinde

Inspirational

कृषी दिनाच्या शुभेच्छा!

कृषी दिनाच्या शुभेच्छा!

1 min
6.1K


कृषी दिनाच्या मनापासून शुभकामना....!!!

कृ ती करतो शेतकरी

शि वारातून पिकविण्या मोती

दि न रात राब राबूनी

ना स्तिकाच्याही ओठी दानापाणी घालतो

च्या यला मायला सहन करतो


म नातच सारा अपमान गिळतो

ना ना चा कित्ता सदा ऐकतो

पा यापडूनी अजूनही भीक मागतो

सु तावरूनी स्वर्ग गाठतो

न सण्यातून असणे काढतो


शु भ कार्याला वाहून घेतो

भ लते सलते मोह टाळतो

का माला तो सदा वाहून घेतो

म नापासूनी देश सेवा करतो

ना फायदा ना तोटा चे दिवस पाहतो


तरीही सुखा समाधानाचे

जीवन कंठतो

हृदयातुनी सदा याच्या आशीर्वादच झरतो

आशा बळीराजास मी नमन करितो

अंतःकरणा पासुनी

कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो.....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational