STORYMIRROR

shubham gawade Jadhav

Abstract Others

3  

shubham gawade Jadhav

Abstract Others

कर्ण

कर्ण

1 min
380

कुंतिभोज कन्या कुंतीच्या 

सेवेवर दुर्वास ऋषी प्रसन्न झाले 

दुर्वास ऋषींनी मग तिला 

खूश होऊन एक वरदान दिले 


त्याच वरदानामुळे 

एकाचा जन्म झाला

कानी कुंडल अंगी कवच घेऊन 

महारथी कर्ण उदयास आला 


जन्म झाल्याबरोबर त्याला 

गंगा नदीत सोडून द्यावं लागलं 

अनौरस संतती म्हणून 

लहानपणीच घोषित झालं 


वाहत वाहत मग तो 

राधा मातेला भेटला 

सूतपुत्रच म्हणून मग 

या जगाला वाटला 


नाही तो क्षत्रिय म्हूणन 

द्रोणाचार्यानी शिक्षण नाकारलं 

सूतपुत्र आहे असं तेव्हाच 

त्याने स्वीकारलं 


परशुरामांकडून शिक्षा घेण्याचा 

अट्टहास त्याने केला 

शिकला विद्या पण क्षत्रिय नव्हता समजल्यावर  

 विसरून जाशील विद्या असा शाप दिला 


एक गाय त्याच्या बाणांनी 

चुकून मारली गेली 

गायवाल्यांनी त्याची चूक नसताना 

पुन्हा त्याला शापाची शिक्षा केली 


द्रौपदीच्या स्वयंवरात त्याला 

अपमान सहन करावा लागला 

सूतपुत्र म्हणून भरसभेत 

त्याच्यावर चिखल फेकला गेला 


कुंतीने शेवटी त्याचं सत्य 

पांडवांना वाचवण्यासाठी सांगितलं 

पराभव करायला त्याचा देवांनाही 

कट कारस्थान कराव लागलं 


जे काही मिळाल त्याला 

ते दुर्योधनाकडूनच मिळालं 

म्हणूनच तर त्याचे सर्वस्व त्याने 

त्याच्या दोस्तीवर वाहिलं 


ना आई मिळाली ना तिचं प्रेम 

उभ आयुष्यभर अपमानाचे चटके मिळाले 

हा घेतली बाजू त्याने दुर्योधनाची 

सांगा ना त्यात त्याचे काय चुकले 

त्यात त्याचे काय चुकले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract