क्रिकेट चाहता देश
क्रिकेट चाहता देश
सामना असता क्रिकेटचा..
तोही भारत पाकिस्तानचा..
युद्धच जणू झुंजले सीमेपार देशाच्या..
कमान हाती असते देशाच्या खेळाडूंच्या...
चाहत्यांच्या उत्साहाला येतो महापूर..
क्रिकेट साठी मतभेद सारे राहते कोसो दूर..
देशासाठी क्रिकेट प्रेमी करतात यज्ञ याग..
खेळाडूंना जिंकण्यासाठी करतात ते भाग...
सारे काही जातात विसरून नसतो कोणता वैर..
कोणी देशावर बोट उचलले तर नसते त्यांची खैर..
क्रिकेट असतो प्राण जणू क्रिकेट चाहत्यांच्या..
सारा देश रममाण होऊन जातो सामन्यामध्ये क्रिकेटच्या..
