करावे कष्ट
करावे कष्ट
यंत्रयुगात बटन दाबीता
चुटकीसरशी होई काम।
श्रम करण्या नसे तयार
कष्टा विना मिळे आराम।।
अपार महत्व शारीरिक कष्टाला
जितके असे बौद्धिक श्रमाला।
न मिळे आनंद कदापि
गाळल्याविना घामाला।।
मेहतीने होई आनंद
कामाचे होई सार्थक।
व्यायामाने सुधारे शरीर
श्रमाचे महत्व खास।।
संत रामदास म्हणती
फळ मिळण्या कष्ट पाहिजे।
केल्याने होत आहे रे
आधी केलेच पाहिजे।।
