क्रांतिवीर
क्रांतिवीर
भीमरावाच्या रुपात
महामानव अवतरला
दीप ज्ञानाचे लावूनी
साऱ्या वंचिता उद्धारीला
गर्द काळोख्यात चाचपड
होते काही वंचित समाज
अफाट परिश्रमाने त्याच्या
प्रगतीपथावर वंचित आज
कांदा भाकरी उदरी भरून
कण कण ज्ञानाचे वेचीला
असंख्य पदव्या घेऊनी
समाज हिता कार्य केला
धन्य धन्य पिता रामजी
धन्य भाग्यवंत भिमाई
चांद सूर्यासही लाजवे
ऐसा सुता जन्म देई
थोर माईचे उपकार
दिला क्रांतिवीर पुत्र
वाईट बंधने तोडण्या
केले योग्य संस्कार
