STORYMIRROR

Chandanlal Bisen

Inspirational

3  

Chandanlal Bisen

Inspirational

क्रांतिवीर

क्रांतिवीर

1 min
231

भीमरावांच्या रुपात

महामानव अवतरला

ज्ञानज्योती लावूनी

 वंचिता उद्धारीला..


गर्द काळोखी चाचपडे

काही वंचित समाज

अफाट ध्यासी श्रमातून

प्रगती पथावर आज..


कांदा-भाकरी खाऊनी

कनोंकन ज्ञानाचे वेचीला

अनेक पदव्या घेऊनी

समाज उद्धारा कार्य केला..


धन्य पुण्यवान रामजी

धन्य पुण्यवान भिमाई

चांद-सूर्यास लाजवे परी

दिव्य सुतास जन्म देई..


थोर भिमाईचे उपकार

दिला क्रांतिवीर तारा पुत्र  

काळिमा बंधने तोडण्या

केले सुयोग्य संस्कार..     


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational