STORYMIRROR

Sarika Jinturkar

Inspirational

2  

Sarika Jinturkar

Inspirational

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

1 min
101

स्वातंत्र्य पूर्वीचा काळ 

महिलांना नव्हता शिक्षणाचा अधिकार 

व्यथा समाजाची ज्योतिबा सावित्रीने जाणली 

स्त्रियांच्या शिक्षणासाठी अविरत ज्ञानगंगा दारी आणली


मिळावा बालिकांना जगण्याचा हक्क

म्हणून चंदनापरी झिजवलेस देह 

दरवळ त्याचा मनोमनी

 ज्योतीसम जळाली प्रकाशण्या तारांगणी 

 रचल्या स्त्रीशिक्षणाच्या भिंती

 पसरवली ज्ञानमृताची

 पावन गंगा,

झेलल्या नको त्या वेदना क्षणोक्षणी 


दिली सदैव ज्योतीबांची साथ 

पण नाही मानली हार कधी  


तुझ्या अथक प्रयत्नांनी आम्हाला लाभली

अमृताची वाणी या ओठांनी सदैव गात रहावी तुझी गाणी 

हाती लेखणी आमच्या 

तुझ्यामुळे आली

जरी काळोख्या वाटा तरीही चालत सदैव जावे

जाता जाता या ओठांवर गीत क्रांतीचे गावे  

ठाम असावा मार्ग आपला तमा नसावी काही

 तुझ्यामुळेच शिकवण आम्हा मिळाली

 भारतीय प्रथम महिला शिक्षिका

 मुख्याध्यापिका,प्रचंड साहस व अद्भुत तुझी प्रतिभा  


सोसूनी अनंत यातना 

शिकवले स्त्रियांना

 धन्य धन्य होतो आम्ही थोरवी तुझी गातांना 

वंदन तुला करते 

कर जोडूनी आता 

तुझ्या चरणी सदैव अशाच झुकत राहो माझा माथा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational