कोवळी पालवी
कोवळी पालवी
वसंताच्या आगमनाने
फुटली कोवळी पालवी
कोकिळेची सुरेल तान
पानाफुलांनाही झुलवी
आला पाऊस वळवाचा
चमकलीत पोपटी पाने
चैत्रपुनवेचा आला सण
प्रफुल्लित झालीत मने
भरारलाय हा रानवारा
झालाय द्वाड अवखळ
झुलवितोय वृक्षवेलींना
करिती पाखरे वळवळ
आम्रवृक्ष भरी मोहराने
सुगंध सर्वत्र दरवळला
झुळझूळला हा निर्झर
ओढाही खळखळला
किलबिल पाखरांची
ऐकु रानातूनी आली
गाणी मंजुळ खुशीची
साद प्रीतीचीच घाली
