कोरोनातली सेवाभावीका
कोरोनातली सेवाभावीका
जन आरोग्य सेवा देते
गरजा ओळखून नोंदी ठेवते,
सौजन्य सेवाभावे तत्पर
परिचारिका जबाबदारीने वागते...१
दिवसभर राब राबते
पीपीई किट मध्येच राहते,
कोरोना पेशंटना धैर्य देऊन
स्वतः मात्र झिजत राहते...२
आईसम सर्वा सांभाळते
बहिणीसम माया ही लावते,
नित्य निगराणीत ही ताई
सेवा मनोभावी सर्वांची करते...३
खचता मनोधैर्य रुग्णांचे
उत्साह वाढवीत मनात त्यांच्या,
कधी ना देती अंतर त्यांना
सूचनांचे पालन करी डॉक्टरांच्या...४
काळ आला असा हा महामारीचा
तरी ना घाबरे परिचारिका,
देवपूजा हीच जनसेवा मानून
निर्मळ स्वच्छ मनाने वागे सेवाभावीका...५
