कोरोनाशी सामना
कोरोनाशी सामना
आजपर्यंत रणांगणात होत होती लढाई
जिंकलो आपण छाती ठोकून मारायचो बढाई
नाही रणांगण कोरोनाला युद्ध करणं झालं भारी
घरातच राहून करू त्याच्याबरोबर मारामारी
नका वापरू ढाल, तलवार, खंजीर, भाला
स्वच्छता राखा, मास्क लावा, अंतर ठेवून बोला
खाऊ नका रस्त्यावरचे, घरातच बनवा हॉटेल
फळांचा रस करून घरीच बनवा मॉकटेल
नक्कीच होईल विजय, प्रत्येकाची आस मनी
सुखरुप राहा आनंदाने आपापल्या घरी
घराबाहेर पडण्याचा नका धरू हट्ट, विनंती हात जोडून
थोड्यासाठी नका घेऊ कोरोनाचे संकट ओढवुन
सापडेल त्यावर उपाय, इलाज, लस जरी
तोपर्यंत प्रत्येक जण प्रत्येकाला सांभाळा,
पळवून लाऊ कोरोनोला, असला जरी भारी॥
