कोरोना नन्तरची शाळा
कोरोना नन्तरची शाळा
वाजेल घंटा भरेल शाळा
आनंदाला येईल उधान।।
थोड्या गप्पा, थोड़ी गम्मत
आणि चेहऱ्यावर भेटेल समाधान।।
वर्ग उघड़तील, लेकरे येतील
पुन्हा खेळ राजा,चोर अन प्रधान।।
खडू फळ्याची होईल भेट
गणिताचे सापडेल निदान।।
पुन्हा बसतील पंगती सगळ्या
मनोमन खळखळून हसेल मैदान।।
पुन्हा सगळ सुरळीत व्हावे
हेच मिळावे निसर्गाकडून दान।।
