आरोग्य
आरोग्य
सर्वात महागाची मिळे, आरोग्याची खाण,
जपा आपले शरीर, जे दिले भगवंताने दान।।
असता निरोगी तन, कदर न वाटे कुणा त्याची,
आजाराचा होता घाव, पळता न पुरे वाट दवाखान्याची।
मिळता जीवन सुंदर, नसे त्याची किंमत,
कमावता कमावता होते, आजारांची संगत।।।
म्हणूनच विसरू नका स्वतःला,आरोग्य हेच मोठे धन,
असाल निरोगी शरीराने, तरच आनंदी राहील मन।।।
कारण विचारून बघा रोग्याला, पीडा कशी असते,
सोडायची म्हणलं तरी, आजाराची साथ सुटत नसते।।।
जपलं आरोग्याचं धन, तर सापडेल सुख जीवनभर,
आनंदाचे झाड सदा, बहरेल तुमच्या अंगणभर।।।
