खंत
खंत
हरवल्यासारखं वाटतंय काहीतरी,
मन भरून येतय पुन्हा पुन्हा,
पण का हे कळत नाही आज।।
उगीच त्रास मनाला होतोय
शब्द नाही सापडत बोलायला,
का समजत नाही आज।।
मन वेड्यासारखं भरकटतय,
उगाच त्रास करुन घेतय,
पण का माहित नाही आज ।।
त्रास होतोय खुप,
जखम जूनी जणू ठणकतेय,
पण का उमजतच नाही आज।।
ना अन्नाची भूक आहे,
ना समाधानाची झोप,
जगणच माझ मला छळतय आज।।
कशाची वाटतेय खंत,
का दाटतोय कंठ,
काहीच कस उलगड़त नाही आज।।
कासावीस होतोय जीव,
गुदमरतोय माझा श्वास,
कुणास ठाऊक का कळत नाही आज।।
हरवल्या सारख वाटतंय काहीतरी,
मन भरून येतय पुन्हा पुन्हा,
का ते समजत नाही आज।।
