वरूणराजा
वरूणराजा
कालच झाला पोळा
असा कसा प्रमाद केलास
पीक सगळं वाहून गेलं
सांग तू असा जीवावर का उठलास?
एकाच दिवसात उद्ध्वस्त सगळं
होत्याचं नव्हतं करून टाकलास,
सगळे पीक पाण्यात बुडलं
सांग तू असा जीवावर का उठलास?
एक तपानंतर यावर्षी सगळं
कसं आलबेल केलं होतास
सणाचा आनंद ओसरण्याआधी
सांग तू असा जीवावर का उठलास?
स्वप्न दाखवलेस डोळे भरून
एका रात्रीत पूरासंग वाहून नेलास,
खोटीच दाखवलीस आशा
सांग तू असा जीवावर का उठलास?
काल होता पोळा पण मी दिवाळी केली
म्हणलं पिक येतय चांगलं तर
सगळ्या कुटुंबाचा मी लय थाट केला
सांग तू असा जीवावर का उठला?
अरे नसेल जगवायचं सुखान
तर मारून तरी टाक ,
वाहुन ने पुरा संग आम्हाला पण
नाही तर
सांग तू असा जीवावर का उठलास?
आता डबल तेच होणार
कर्ज वाढून मला मरणादारी नेणार,
पोरबाळ माझी आता अनाथ होणार
आता तरी बोल
काल तू एवढा का हसलास ?
सांग की तू माझ्या जीवावर का उठलास?
सांग की तू असा जीवावर का उठलास?
