दिवाळी
दिवाळी
दिवाळीचा पाडवा मंतरलेले क्षण,
लक्ष लक्ष दीप जळती उजळती मन.
अंधारात इथे दिवे रोज-रोज जळतात,
कुठे कुठे माणसांची मनेही जळतात.
कुठे प्रकाशाच्या किरणासाठी रात्रंदिन जिवाचे रान,
काळाकुट्ट अंधार कुठे रोज पोटाचा अंगार.
महालात रोजच दिवाळी, रोज नवे जीवन श्रृंगार
दिवा जळतो सर्वांसाठी त्यास नसे दुजभाव,
माणसानेच माणसासाठी का केला असे भेदभाव.
सगळीकडे आज आतिषबाजी नसे आनंदाला अंत,
वंचितांच्या जीवनात मात्र रोजच भाकरीची भ्रांत.
दिवाळी येते दिवाळी जाते,
दीनदुबळ्या माणसांना त्याचे काय वाटे
कुठे मिठाई, रोशनाई आणि कपड्यांचा महापूर,
तर कुठे झोपडीत अर्धवट उघड़या देहाच्या वेदनाचा काहूर.
प्रकाशात दिवे लावण्यापेक्षा अंधारात दिवा लावा,
झोपडीत थोड़ा आनंद वाटून प्रकाशाला अर्थ द्यावा.
